अखेर चौकशीचे आदेश धडकले; समिती गठीत

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत डोंगरला येथे झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी तीन सदस्यीय समिती सुद्धा गठीत करण्यात आली आहे. याकडे राजकीय पुढारी तसेच परिसरातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत डोंगरला ही भ्रष्टाचारात लिप्त असल्याचे कैलास बनकर, सुनील पटले व संगीता शरणागत यांनी मागितलेल्या माहितीच्या माहितीवरून उघड झाले आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

सदर तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत डोंगरला येथील कथीत भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावे असा आदेश जिल्हा प्रशासनाने ४ नोव्हेंबर रोजी पंचायत प्रशासनाला दिला असून सदर आदेशाची प्रत तक्रार करते कैलास बनकर, सुनील पटले व संगीता शरणांगत यांना सुद्धा देण्यात आली आहे. पंचायत समिती तुमसरचे सहाय्यक गट विकास अधिकारी एम. एम. वासनिक, यु. के. पाटे विस्तार अधिकारी व कनिष्ठ अभियंता पुजारी यांचा तीन सदस्यीय समितीमध्ये समावेश आहे. झालेल्या कथीत भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी १७ नोव्हेंबर रोजी होणार असली तरी ग्रामपंचायत प्रशासनाला याची लेखी सूचना देण्यात आली असून डोंगरला ग्रामपंचायत मध्ये २०१२ ते २०१७ मध्ये घडलेल्या प्रकरणाची पुन्हा पुनरावृत्ती तर होणार नाही ना अशी चर्चा चांगलीच जोर धरून आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *