रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातच उतरवल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ आणि ‘सुरक्षित प्रवास’ अशी मोठी ब्रीदवाक्ये मिरवणाºया एसटी महामंडळाचा एक अतिशय बेजबाबदार आणि संतापजनक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. भंडारा येथून मुंढरी गावाकडे जाणाºया एसटी बसमधून प्रवास करणाºया दोन विद्यार्थिनींना चालक आणि वाहकाने केवळ बसमध्ये इतर प्रवासी नाहीत या कारणावरून रात्रीच्या मिट्ट अंधारात वाटेतील रोहा गावात जबरदस्तीने खाली उतरवून दिले. या अमानुष आणि असंवेदनशील प्रकारामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

भंडारा ते मुंढरी धावणारी एसटी बस रोहा गावात पोहोचली तेव्हा त्या दोन विद्यार्थिनींशिवाय बसमध्ये दुसरा कोणताही प्रवासी नव्हता. हे कारण पुढे करत संवेदनशीलता विसरलेल्या एसटीच्या चालक-वाहकाने अंतिम मुक्काम येण्याआधीच त्या मुलींना रात्रीच्या वेळी रस्त्यातच सोडून दिले. या धक्कादायक प्रकारची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांनी आपला नियोजित दौरा तात्काळ रद्द करून थेट रोहा गाठले आणि संबंधित चालक-वाहकाला चांगलेच धारेवर धरले. तसेच, त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना फोनवरून संपर्क साधत या बेजबाबदार कर्मचाºयांवर कठोर कारवाईची मागणी केली. सभापती आणि पालक वेळीच तिथे पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला, परंतु रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी दोन विद्यार्थिनींना सोडून देताना त्यांच्या सुरक्षिततेचा साधा विचारही न करणाºया कर्मचाºयांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षेची हमी दिली जात असताना प्रत्यक्षात असा प्रकार घडत असेल, तर महिला आणि विद्यार्थिनींनी प्रवास करायचा कसा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. आता या प्रकरणी एसटी प्रशासन संबंधित दोषी कर्मचाºयांवर काय आणि कशी कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *