तूर पिकावरील घाटे अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : तूर पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून, ढगाळ वातावरणामुळे पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: शेंगा पोखरणाºया अळीच्या आक्रमणामुळे उत्पादनात ७० टक्क्यांपेक्षाही अधिक घट होऊ शकते. यामध्ये हिरवी घाटे अळी, पिसारी पतंगाची अळी आणि शेंगमाशीच्या अळीचा प्रामुख्याने समावेश आहे. हिरवी अळी तुरीच्या कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालते. सुरुवातीच्या अवस्थेत पाने व देठ कुरतडणारी अळी पुढे शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते. ही बहुभक्षी कीड हरभरा, वाटाणा व चवळी पिकांवरही आढळते. शेंगमाशीची अळी पांढºया रंगाची असून शेंगांच्या आत राहून दाणे अर्धवट कुरतडते. त्यामुळे दाण्यांची गुणवत्ता व उत्पादन घटते.

घाटे अळीचे प्रतिझाड एक अळी किंवा ५ ते १० टक्के नुकसान दिसून आल्यास तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सुरुवातीला ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीएम ५० मिली अथवा १५०० पीपीएम २५ मिली, तसेच क्विनालफॉस २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किडीचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४.५ ग्रॅम, इथिआॅन ५० टक्के ईसी २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. वरील मात्रा साध्या नॅपसॅक स्प्रेअरसाठी असून पॉवर स्प्रेअरसाठी प्रमाणानुसार मात्रा समायोजित करावी. तूर पिकाचे घाटे अळीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांनी नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, साकोली यांनी केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *