भरधाव ट्रकची ई-रिक्षाला धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: देवरी तालुक्यातील रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर भरेंगाव फाट्याजवळ बुधवारी (१८ नोव्हेंबर) सकाळी १० वाजताच्या सुमारास भरधाव ट्रकने ई-रिक्षाला मागूनजोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ईरिक्षाचालकासह सहा जण जखमी झाले असून, चौघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.मळालेल्या माहितीनुसार, एमएच ३५ एएच २२०३ क्रमांकाची ई-रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना भरेर्गाव फाट्याजवळ सीजी ०८ एझेड २४५१ क्रमांकाच्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे ई-रिक्षातील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्य करीत जखमींना देवरी येथील ग्रामीण्रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये अनन्या भाऊराव चुटे (१८), गुंजन भाऊराव चुटे (१७), हर्षिता राजेंद्र सरोटे (१७) सर्व राहणार कुंभारटोला, भानुबाई निपुर मडावी (४०), रा. भरेर्गाव, वेदिका संजय गाते (१३) व युक्तिका संजय गाते (४) रा. शिरपूर आणि ई-रिक्षाचालक देवेंद्र संपत सरोटे (४५) रा. शिरपूर यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अनन्या चुटे, हर्षिता सरोटे, वेदिका गाते आणि भानुबाई मडावी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची चौकशी देवरी पोलिस करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *