अवैध दारू व जुगार अड्डयांवर पोलिसांचा धडाका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील अवैध दारू- विक्री आणि जुगाराचे अड्डे समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी दिलेल्या निदेर्शानुसार जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत पवनी, मोहाडी, करडी आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत जुगार साहित्य, गावठी दारू आणि सडवा मोहफुलाचा साठा असा एकूण ४ लाख ९८ हजार १५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पवनी पोलिसांनी वैजेश्वर वॉडार्तील साबीर खान जुलेखा पठाण (४७) याच्याविरुद्ध जुगारप्रकरणी कारवाई केली. त्याच्याकडून १ हजार २०० रुपये रोख, सट्टापट्टीचे दोन कागद, कार्बनचा तुकडा, डॉटपेन आणि दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३ हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अप. क्र. ६०८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मोहाडी पोलिसांनी ढोरवाडा येथील विक्की गणराज भुरे (२५) याच्याविरुद्ध कारवाई करत चार प्लास्टिक पोत्यांमध्ये भरून ठेवलेला २४० किलो सडवा मोहापास जप्त केला. या साठ्याची किंमत ४ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी अप. क्र. ४२८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करडी पोलिसांनी देव्हाडा बुज येथील पुनम प्रकाश वासनिक (४०) हिच्याकडून अंदाजे १० लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू जप्त केली.

या दारूची किंमत दोन हजार रुपये असून याप्रकरणी अप. क्र. २९४/२०२६ अन्वये कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साकोली पोलिसांनी सानगडी येथील ६५ वर्षीय महिलेवर कारवाई केली. तिच्याकडून दोन प्लास्टिक डबक्यांमध्ये प्रत्येकी २० लिटर आणि तीन प्लास्टिक बाटल्यांमध्ये प्रत्येकी दोन लिटर, असा एकूण ४६ लिटर हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ९ हजार २०० रुपये आहे. याप्रकरणी अप. क्र. ८७६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पवनी पोलिसांनी भुयार येथील शुभम चिंधु शंभरकर (३२) याच्याकडून १० लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू (किंमत १ हजार ५०० रुपये) जप्त केली. याप्रकरणी अप. क्र. ६०९/२०२६ अन्वये कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे भुयार येथील हरिदास बुधाजी नागोसे (५१) याच्याकडून १५ लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू (किंमत २ हजार २५० रुपये) जप्त करण्यात आली. याप्रकरणी अप. क्र. ६१०/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यातील अवैध दारूविक्री, जुगार आणि इतर अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरू असून अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी असणा?्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *