भंडारा कृउबास सभापतीपदी आशु वंजारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ दिसुन आली. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस यांनी एकत्रीत येत भाजपला सत्तेबाहेरचा रस्ता दाखवला. या नव्या राजकीय समीकरणातून शिवसेनेचे आशू (जयराम) वंजारी यांची सभापतीपदी १५-० अशा एकतर्फी मतांनी निवड झाली. बाजार समितीतील सत्तांतरामागे अडीच वर्षांपूर्वी भाजपने दिलेले लेखी आश्वासन न पाळल्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला.

याच नाराजीतून शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस यांनी एकत्र येत भाजपच्या विद्यमान सभापतींविरोधात अविश्वास ठराव आण्ल्याचे सांगण्यात येत आहे. १८ सदस्यीय बाजार समितीत भाजपचे तीन सदस्य मतदानावेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे उपस्थित १५ सदस्यांनी आशू वंजारी यांच्या बाजूने मतदान केले. परिणामी १५-० अशा मतांनी त्यांची सभापतीपदी निवड निश्चित झाली.या निवडणुकीने भंडारा बाजार समितीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, भाजपला बाजूला सारण्यासाठी विरोधी पक्षांनी केलेली एकजूट जिल्ह्याच्या राजकीय वतुर्ळात चर्चेला विषय ठरली आहे. आगामी राजकीय घडामोडींवरही या सत्तांतराचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *