डॉ. प्रवीण तोगडिया २१ नोव्हेंबरला भंडाऱ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ हिंदुत्ववादी नेते डॉ. प्रवीण भाई तोगडिया हे शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी भंडारा शहराच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यादरम्यान ते दुपारी १२ वाजता भंडारा येथील पतंजली मेगा स्टोअरला भेट देणार आहेत।

या भेटीदरम्यान डॉ. तोगडिया विविध सामाजिक, राष्ट्रीय व संघटनात्मक विषयांवर चर्चा करणार असून, पत्रकारांशी वार्तालाप व संवाद साधणार आहेत। तसेच भंडारा शहरातील काही गणमान्य नागरिकांशीही ते यावेळी संवाद साधणार आहेत। त्यांच्या या भेटीतून विविध महत्त्वाच्या विषयांवर विचारांचे आदानप्रदान होणार आहे।

डॉ. प्रवीण भाई तोगडिया हे वैद्यकीय क्षेत्रातील कर्करोगतज्ज्ञ असून, विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ संघटनात्मक जबाबदारी सांभाळली आहे। सध्या ते आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत।

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *