काचेवानीतील अदानी प्रकल्पाचे अतिक्रमण हटवा

 

भूपेंद्र रंगारी यांचे प्रशासनाला निवेदन; ७ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

 

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

तिरोडा : तालुक्यातील काचेवानी येथील गट क्रमांक ६७६ मधील जमिनीवर अदानी वीज प्रकल्पाने केलेले अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अन्यथा ७ डिसेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा भूपेंद्र रंगारी यांनी प्रशासनाला दिला आहे। यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी, तिरोडा यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे।

काचेवानी येथील गट क्रमांक ६७६ वर अदानी प्रकल्पाचे अतिक्रमण असल्याची तक्रार भूपेंद्र रंगारी यांनी प्रशासनाकडे केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने भूमी अभिलेख विभागामार्फत संबंधित जमिनीची मोजणी करण्यात आली। या मोजणीत गट क्रमांक ६७६ च्या काही भागावर अदानी प्रकल्पाचे अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे।

दरम्यान, या प्रकरणात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोपही रंगारी यांनी केला आहे। संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच गट क्रमांक ६७६ वरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे।

प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास ७ डिसेंबर २०२६ पासून तिरोडा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा भूपेंद्र रंगारी यांनी निवेदनातून दिला आहे।

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *