समस्या मार्गी लावण्यासाठी माजी खासदार सुनील मेंढे यांचा पुढाकार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहर बायपास मार्गावरील पलाडी गावाजवळ नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणीचा सामना करावा लागत असून, विशेषत: पलाडी गावातील नागरिकाना व मेडिकल कोलेज कडे जाणाºया रस्त्याच्या अडचणींचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्यांसह परिसरातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी माजी खासदार सुनील मेंढे यांनी संबंधित अधिकाºयांसोबत चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.

बायपास मार्गावरून पलाडी तसेच परिसरातील गावांकडे जाताना वाहनांच्या वेगामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण होत आहे. तसेच निवासस्थानी जाणाºया नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी पयार्यी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांकडून होत आहे. मंजूर झालेल्या कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली. संबंधित कामांसाठी २० कोटी निधी मंजूर असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.

कामाच्या प्रगतीबाबत चर्चा करून संबंधित अधिकाºयांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. माजी खासदार सुनील मेंढे यांनी संबंधित अधिकाºयांशी चर्चा करून पलाडी गावातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना केल्या. मेडिकल कॉलेजकडे जाणारा रस्ता व पलाडी च्या नागरिकांची गैरसोय दूर करून सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच सुरू असलेली काम लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आणि विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका माजी खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी असित बागडे, प्रफुल रामटेके, राजकुमार लोणारे, राजकुमार नेवारे, कैलाश चामलाटे, लक्ष्मण बारापात्रे, पंकज श्यामकुवर व इतर गावकरी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *