कर्जमाफी मिळाली; मात्र नवीन पीककर्जासाठी शेतकऱ्यांची बँकांमध्ये वणवण! जुनी कर्जखाती बंद नसल्याने नवीन कर्जवाटप रखडले; दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असून, पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभही मिळू लागला आहे. मात्र, कर्जमाफीचा लाभ मिळूनही बँकांमधील जुनी कर्जखाती अद्याप बंद झाली नसल्याने शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. खरीप हंगामातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी तसेच आगामी शेतीच्या कामांचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांचे उंबरठे झिजवले; मात्र दिवाळी उलटूनही नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. त्यामुळे कर्जमाफी होऊनही शेतकरी आर्थिक अडचणीतच अडकून पडले आहेत.

दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. त्याचबरोबर दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आगाऊ रक्कम म्हणून एक हजार रुपये जमा करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर नवीन पीककर्ज मिळेल आणि शेतीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखांशी संपर्क साधून नवीन पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही केली. मात्र, प्रत्यक्ष कर्जवाटपाची वेळ आली असता जुन्या कर्जखात्यांचा प्रश्न आडवा आला आहे. शासनाकडून कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली असली, तरी बँकांच्या स्तरावर संबंधित कर्जखाती अद्याप बंद करण्यात आलेली नाहीत. परिणामी, नवीन पीककर्ज मंजूर करून त्याचे वितरण करण्यास अडचणी येत असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

विशेष म्हणजे, कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्यासाठी पुन्हा बँकांच्या चकरा माराव्या लागत आहेत. कर्जमाफीमुळे जुन्या कर्जाचा भार कमी झाला असला, तरी नवीन कर्ज उपलब्ध नसल्याने शेतीच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत आहे. सणासुदीच्या काळात आर्थिक मदतीची अपेक्षा असलेल्या अनेक शेतकऱ्यांची दिवाळीही आर्थिक विवंचनेत गेली.

दरम्यान, शासन आणि बँकांमध्ये ‘हेअरकट’ खात्याबाबत करार झाला असून, त्यानुसार शासनाकडून देय असलेली रक्कम आणि बँकांच्या स्तरावरील आर्थिक ताळमेळ विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने कर्जखाती बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन पीककर्ज वितरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, तसेच नवीन पीककर्जाचे प्रत्यक्ष वाटप कधी सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळूनही नवीन कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. शासनाने कर्जखाती बंद करण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करू

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *