लाखनी तालुक्यात सट्टा व्यवसाय जोमात?

● विभाग मात्र कोमात ● व्यवसाय झाला डिजिटल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी:- झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तालुक्यात सध्या सट्टा व्यवसाय जोमात सुरू असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहे. यात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात अडकल्याने व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर आहे. २ आकड्याच्या खेळात आपण मालामाल होऊ या लालचेने तालुक्यातील विद्यार्थी, तरुण व नागरिक या आकडेवारीच्या नादात गुंतलेले असून त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. यात तरुण पिढी मोठ्या उत्साहाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.

एकट्या लाखनी शहरात ६ -७ सट्टा व्यावसायिक असल्याची विश्वसनीय माहिती असून परिसरात लाखोरी परिसरात एक उदयोन्मुख सट्टा व्यावसायिक तयार झाला असून अशीच परीरीस्थिती तालुक्यातील इतरही गावात असून लाखनी पोलीस विभागाला याची कल्पना असली तरीही येथील ठाणेदार मात्र अलिप्त असल्याची भूमिका बजावत आहेत. यासंबंधी भंडारा पोलिसांना विशेष माहिती असून त्यांनी या व्यावसायिकांची इतमभूत माहिती काढल्याची विश्वसनीय माहिती आहे परंतु वैभव लक्ष्मी च्या नादात त्यांचेही भले होत असल्याने ते ही कार्यवाही करण्यास धजावत नाही. मात्र या वैभव लक्ष्मी मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असले तरीही विभागातील कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच भले होत आहे यामुळे महिला वर्गात मोठा असंतोष पसरला आहे. हा लेखानिक व्यवसाय सध्या डिजिटल झाला आहे. मात्र या लेखनिकाची चर्चा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये सुरू आहे.

उद्याचे भविष्य असलेली तरुण पिढी व्यवसाय नसल्याने लवकर श्रीमंत होण्याच्या नादात या व्यवसायाकडे वळल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच हा कधीही बंद न होणारा व्यवसायावर वचक कसा निर्माण करता येईल याकडे लक्ष दिल्यास जिल्ह्यातील तरुण पिढी व्यसनाधीन होण्यापासून परावृत्त करण्यात मोलाचा वाटा ठरेल त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज पडली आहे.

व्यवसाय झाला डिजिटल

पूर्वीच्या काळी कागद आणि पेनाद्वारे आकडे लिहिण्याची पद्धत होती. बदलत्या काळानुसार लेखणीक हा व्यवसाय डिजिटल झाला असून आकडे संबंधिताकडे पाठविण्यासाठी सोशल मिडिया, व्हाईस मेसेज, साधा मेसेज आणि नयनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पाठविला जात आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *