टॅक्सची वसुली मात्र सुविधांचा अभाव

लाखनी : मानेगाव येथील ग्रामपंचायतीने मूलभूत सोयी सुविधा पुरविल्या नसल्यामुळे रहिवासी जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन घरांचे बांधकाम करण्यात आले त्यासाठी ग्रामपंचायतीने टॅक्स घेऊन आपले कर्तव्य बजावले असले तरी ग्रामपंचायतीने मूलभूत सोयी सुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना चिखलातून घरी जावे लागत आहे. त्यामुळे रात्री बे रात्री घरी जावे कसे असा प्रश्न वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पडला आहे.एरवी मतांचा जोगवा मागणारे लोकप्रतिनिधी या समस्येंकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

ग्रामपंचायत पदाधिकारी या नागरिकांच्या समस्या कडे दुर्लक्ष करून नागरिकांना वाºयावर सोडले आहे परिसरात मूलभूत सोयी सुविधा नसल्यामुळे सरपटणारे प्राणी पावसामुळे बाहेर निघत असतात त्यांच्याही धोका नागरिकांना होत असतो ग्रामपंचायतीने सांडपाण्याची व्यवस्था न केल्यामुळे परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत ते सांडपाणी साचत असल्यामुळे रोगरा- ईला आमंत्रण देत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. मूलभूत सुविधांमध्ये ग्रामपंचायतीने पिण्याचे पाणी, रस्ते, गटारे ,पथदिवे आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असले तरी खाऊ नीतीमुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे या समस्या त्वरित मार्ग काढाव्या अशी मागणी शेषराव बोधनकर यांनी वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *