सनीज स्प्रींग डेल शाळेत हिन्दी दिवस उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सनीज स्प्रींग डेल शाळेत दि.१४ सप्टेंबर रोजी हिन्दी दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. हिन्दी दिनाचे औचित्य साधून सनीज स्प्रींग डेल शाळेच्या हिन्दी विभाग प्रमुख सौ. मीना शील यांनी शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वर्ग ८ वी ची विद्यार्थीनी कु. केसर राऊत हिने हिन्दी दिवसाची माहिती दिली. हिन्दी प्रसिद्ध हिन्दी सा-ि हत्यकार मुंशी प्रेमचंद यांच्या विषयी माहिती वर्ग ६ वी चा विद्यार्थी सक्षम गजभिये याने दिली आणि हिन्दी दिवसानिमित्य वर्ग ६ वी च्या विद्यार्थीनींने नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन केसर राऊत हिने केले आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका आणि शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.