तुमसरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरासह परिसरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाठया वाहन चालकांंविरोधात जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे धडक मोहिम राबवुन विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली .मागील तीन-चार दिवसात जवळपास १११ वाहन चालकांकडुन ५९ हजार ४०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्हा वाहतुक नियंत्रण कक्षाचे पोलीस पथकाव्दारे तुमसर शहरासह परिसरात धडक मोहिम राबविली जात आहे. त्याअंतर्गत ट्रिपल सिट वाहनचालक,सिट बेट न लावणे, फॅन्सी नंबर प्लेट,क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतुक,लायसन्स न बाळगणे ,वाहन चालवितांना मोबाईलचा वापर यासह इतरही वाहतुक नियम मोडणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यासह रस्त्यावर रहदारीस अडथडा निर्माण करणारे वाहन,ठेले, रस्त्यावरील अतिक्रमित दुकान, सामान वस्तू बाबत व प्रवासी वाहतुक करणाºया आँटो रिक्षा, काळी पिवळी प्रवाशी वाहने याचेवर सुध्दा कार्यवाही होत असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण दिसुन येत आहे.तर सुजान नागरीकांकडुन या कारवाईचे स्वागत करण्यात येत असुन अशा कारवायामध्ये सातत्य राखण्यात यावे अशा प्रतिक्रीयासुध्दा काही नागरीका कडुन येत आहेत. मागील काही दिवसांपासून भंडारा येथील वाहतुक विभागाचे पोलीस पथक तुमसर शहरात पायदळ पेट्रोलिंग करून रस्त्यावर अडथळा होईल अशा पध्दतीने दुकानातील सामान/वस्तू ठेवलेल्या दुकान चालकांना सुचना देवुन अतिक्रमित सामान हटविण्यात येत असल्याने जनसामान्यांना वाहतुक सुकर होतांना दिसुन येत

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.