वीज पडून २ शाळकरी विद्यार्थीनी जखमी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : दुपारच्या सुमारास शाळेला सुट्टी झाल्याने शाळेतील बाथरूम मधून वर्ग खोलीकडे जात असलेल्या २ विद्यार्थिनींवर अचानक वीज कोसळल्याने किरकोळ रित्या गंभीर झाल्याची घटना घडली. सदर घटना २० सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील लोकमान्य विद्यालयातील मैदानात घडली. या घटनेत इयत्ता नववी मधील कु. वैष्णवी अरविंद वावरे (१५) रा. मेंढा व कु. आचल तेजराम वाघधरे (१५) इंदोरा या विद्यार्थिनी किरकोळरित्या जखमी झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक सोनी येथील लोकमान्य विद्यालयात परिसरातील विविध गावातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शेकडो विद्यार्थी शाळेत येत असतात. तथापि घटनेच्या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शाळा सुरू झाल्याने दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना मध्यान्न सुट्टी झाली होती.

यावेळी अन्य शाळकरी विद्यार्थ्यांसह घटनेतील दोन्ही जखमी विद्यार्थीनी लघुसंकेसाठी वर्गाबाहेर निघून शाळेतीलच बाथरूम मध्ये गेल्या होत्या. बाथरूम मधून दोन्ही विद्यार्थिनी परत वर्ग खोलीकडे परतत असताना ढगाळ वातावरण जमून एकदम वीज कडाडल्याने वर्ग खोलीकडे जात असलेल्या दोन विद्यार्थींनीवर विज पडली. यावेळी घटनेतील दोन्ही विद्यार्थिनी किरकोळरित्या जखमी झाल्या. तथापि विज पडतात शाळेतील मैदानात दोन्ही विद्यार्थिनी पडलेल्या पाहून उपस्थित अन्य विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाºयांनी दिली आहे. या घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर येथील पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनाला देण्यात आली आहे. या घटनेची माहिती लाखांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांना होताच त्यांनी तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचत दोन्ही विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *