मुले चोरणारे समजून लोकांनी दिला चोप!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया शहरात मुले चोरणारी टोळी असल्याची अफवा असतानाच शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास सावराटोली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात अनोळखी किंबहुना संशयित रित्या फिरणाºया चार जणांना परिसरातील रहिवाशांनी चांगलाच चोप दिला. गोंदिया शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या चारही जणांना ताब्यात घेतले आहे. सावराटोली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास काही अनोळखी व्यक्ती टोळक्याने फिरत होती. या टोळक्यातील काही व्यक्तींनी गुरुवारी सायनकाळी ५ वाजेच्या दरम्यान १२ वर्षीय एका मुलाचा अपहरणाचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलाने आणि स्थानिक नागरिकांनी समयसूकता दाखविल्याने हा प्रयत्न फसल्याचे बोलले जाते. दरम्यान, याच टोळक्यातील दोन पुरुष शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास परिसरात फिरताना दिसले असता मुलांनी पालकांना सांगितलं कि हेच ते वैक्ती जे मला काल पकडण्याचा प्रयत्न करत होते. ही माहिती स्थानिकांना देताच त्यांनीघटनास्थळ गाठून चौघांची चांगलीच धुलाई केली. तथापि, या घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी संशयित चौघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेने मात्र, शहरासह जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *