साकोली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात अल्पवयीन मुलींवर झालेले अत्याचार उघडकीस आल्याने पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

अल्पवयीन मुलींवर अत्याचार

पीडित अल्पवयीन १४ वर्षाच्या मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विधी संघर्ष बालक वय १७ वर्ष यांनी ५ आॅगस्ट २०२२ रोजी अल्पवयीन मुलीला लग्नाची आमिष दाखवून तीन ते चार वेळा शारीरिक संबंध स्थापित करून तीन महिन्याची गर्भधारणा झाल्याने प्रकरण उघडकीस आले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी कलम ३७६, २ एन , भादंवि सह कलम ४/६ पोस्को अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बालविवाह प्रकरण उघडकीस

तालुक्यातील दुसºया प्रकरणांमध्ये ग्राम सालई येथील पोलीस पाटील राजकुमार बापूदास तिरपुडे यांच्या तक्रारीवरून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अतिप्रसंग करून गर्भधारणा केल्यानंतर बालविवाह केल्याचे उघडकीस आल्याने आरोपी हितेश रोहिदास रामटेके २१ वर्ष राहणार सालई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये आरोपी हितेशने १६ वर्षीय अल्पवयीन मुली सोबत शारीरिक संबंध स्थापित करून गर्भधारणा झाल्यानंतर स्वत:च्या आई-वडिलांसह व अल्पवयीन मुलीच्या आईच्या संमतीने लग्न केले होते. अल्पवयीन मुलीला नऊ महिन्याची गर्भधारणा झाल्यानंतर उपचाराकरिता आशा वर्करला माहिती मिळाली. वैद्यकीय तपासणी दरम्यान अल्पवयीन मुलीची गर्भधारणा झाली असून बालविवाह केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाची माहिती पोलीस पाटील यांना कळताच पोलीस पाटील यांनी सदर प्रकरणाची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी हितेश रामटेके व त्याचे आईवडील तसेच मुलीच्या आईवर बालविवाह कायद्या अन्वये व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणाचा तपास ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सेलोकर व कुंभारे करीत आहेत.

 

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *