भेकरची शिकार करणाºया ८ आरोपींना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सावली : तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रांतर्गत सामदा (बु.) येथील एका शेतशिवारात वन्यप्राणी भेकरची शिकार केल्याप्रकरणी ८ जणांना वनविभागाने अटक केली. तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील शेतशिवारात वन्यप्राणी भेकरची गुरुवारी शिकार करण्यात आली. या प्रकरणी वनाधिकाºयांनी महादेव सावजी पोहनकर (३१, रा. सामदा) या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनाधिकाºयांनी महादेव पोहनकर याच्या घरी झडती घेतली असता भेकरचे शिजलेले मांस आढळून आले. हे मांस जप्त करून आरोपीची सखोल चौकशी केली असता सामदा येथील अंजनाबाई कवडु भांडेकर यांच्या पडित शेतामध्ये संबंधित आरोपीने १७ नोव्हेंबरला दुपारी वन्यजीव भेकरची शिकार केली. तसेच मांस घरी खाण्यासाठी आणले. या घटनेत चौकशीअंती इतर आठ आरोपींचे नाव उघड झाले. याप्रकरणी महादेव पोहनकर, सिध्दार्थ परशुराम रामटेके (३०), राकेश कचरु भोयर (२५), अमोल दिवाकर खेवले (३३),गिरीधर देवाजी रामटेके (४१), श्रावण कावरु शेंडे (४६), रामदास सदू भोयर (४८), योगेश हरीदास साखरे (२४), श्रावण बुधा साखरे (६५, सर्व रा. सामदा) यांच्याविरूध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई विभागीय चंद्रपूर वनविभागाचे वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनरक्षक (तेंदू) एन. जे. चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. ए. राजुरकर यांनी केली. आरोपींना २ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली असून, त्यांची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश सावली न्यायालयाने दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *