फेसबुक प्रेम प्रसंगातून अल्पवयीन विद्यार्थीनी गर्भवती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : कॉलेजमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीचे फेसबुक वरून प्रेमप्रसंग जूडले होते. सोळा वर्षाची विद्यार्थिनी व सतरा वर्षाच्या विद्यार्थ्याचे प्रेमप्रसंगातून भेटीगाठी सुरू झाल्या. दोघांची जवळीकता इतकी वाढली की एकमेकांच्या गावी व घरी येणे जाने सुरू झाले. या प्रसंगातून दोघांची जवळीकता इतकी वाढलीकी त्यातून शारीरिक संबंध स्थापित झाले. हे सगळं सुरू असताना विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गर्भधारणा झाल्याचे उघडकीस आले. पीडित विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्यांवर कलम ३७६ एन.१,पोस्को अंतर्गत आज २७ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस बालविधी संघर्ष समितीकडे पाठविण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *