बुटी हायस्कूल गोबरवाही येथे बाल लैंगिक विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुमसर तालुक्यातील बुटी हायस्कूल गोबरवाही शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा रुरल चाईल्ड लाईन भंडाराच्या वतीने “चाईल्ड लाईन से दोस्ती” सप्ताह अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ६५ बालक ५८ बालिका ४ शिक्षक १ शिक्षिका उपस्थित असून प्रमुख पाहुणे म्हणून एम.एन.पवनकर (मुख्याध्यापक बुटी हायस्कूल) तसेच सानिका वडनेरकर (अध्यक्ष बालकल्याण समिती भंडारा) रवींद्र जायबॉय (पोलिस कॉन्स्टेबल गोबरवाही) नितीन राठोड (ट्रॅफिक पोलिस कर्मचारी) व लोकप्रिया देशभ्रतार (जिल्हा प्रकल्प समन्वयक) व चाइल्ड लाईन टीम पूजा धकाते, राकेश लांजेवार, सुनील राणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या बालकल्याण समिती अध्यक्ष सानिका वडनेरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,आजच्या धावपळीच्या जीवनात तसेच वाढत्या बेरोजगारीमुळे आईवडील हे काम धंद्या करिता घरातून बाहेर पळून जात असतात यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करिता अहोरात्र मेहनत करून कुटुंबाचा गाळा चालवितात यामुळे बालकांकडे दुर्लक्ष होत असून बालके व्यसनाच्या आहारी जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचा प्रयत्न करतात.

यामुळे आज मोठ्या प्रमाणात बालगुन्हेगारी व बाल लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचे कारण आई वडिलांचे मार्गदर्शन व थोरांचे मार्गदर्शन न मिळाल्याने हे असे कृत्य करण्यास भाग पडतात आणि यासाठी जबाबदार मोठे थोर असतात त्यामुळे आई वडील यांनी बालकांकडे लक्ष द्यावे. बाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असले तरी विद्यार्थ्यांनी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हे जाणून घेऊन अशा व्यक्तींकडून सावध राहावे व त्याची खबरदारी म्हणून आपल्या आईवडिलांना माहिती द्यावी असे बालकल्याण समिती अध्यक्ष सानिका वडनेरकर यांनी प्रतिपादन केले. तसेच पूजा धकाते यांनी चाइल्ड लाईन ची माहिती व बालकांचे अधिकार व समस्या यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकप्रिया देशभ्रतार (जिल्हा प्रकल्प समन्वयक) यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील राणे व आभार राकेश लांजेवार यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *