मतदारांच्या कर्जाचे परतफेड विकास कामाने करणे हि माझी जिम्मेदारी : आ. भोंडेकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कुठलाही राष्ट्रीय किंवा राज्य स्तरीय पक्षाचा चिन्ह नसताना मला भंडारा विधानसभेत मतदारांनी रेकॉर्ड ब्रेक मताने विजय मिळवून दिला आणि आता माझी जिम्मेदारी बनते कि मी या कर्जाची परतफेड विकासकामाने करावी. बºयाचदा आमदार खासदारांना आपली जिम्मेदारी काय असते ते कळत नाही, परंतु मला माझी जिम्मेदारी कळत असून पवनी च्या विकास करिता अथक प्रयास करीत राहण्याचे वचन आम. नरेंद्र भोंडेकर यांनी दिले. ते पवनी येथे परमात्मा एक मानव मंदिर भवनच्या बांधकाम भूमिपूजन सोहळा आणि संत जगनाडे महाराज समिती येथे किचन शेड भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमास संबोधित करीत होते. आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या आमदार निधीतून पवनीच्या बेलघाटा वाडार्तील संताजी सभागृह किचन शेड बांधकाम करिता २५ लक्ष तसेच परमात्मा एक मानव मंदिर भवनच्या बांधकाम करिता २५ लक्ष रूपाचा निधी देण्यात आला आहे. रविवारी या दोन्ही बांधकामाचे भूमिपूजन आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आम. भोंडेकर यांनी पुढील बांधकाम निधी लागत असेल तर नियोजन करण्याची सूचना दिली आणि त्या करिता समाजाच्या प्रतिनिधींना नियोजन करण्यास सांगितले. ते पढे म्हणाले कि स्वात्र्याला ७५ वर्षे पूर्ण होवून सुद्धा पवनीत आरोग्य सुविधा सुधारू शकली नाही, म्हणून या कडे विशेषत: लक्ष देत पवनी तालुक्यात १०० खाटांचे भव्य असे उपजिल्हा रुग्णालय तयार करण्यात येत आहे. जेणेकरून येथील रुग्णांन अतिदाक्षतेची सोय व्हावी. आम. भोंडेकर यांनी पवनी येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयातील ई-लायब्ररी ला भेट देवून तेथील अभ्यासक विद्यार्थ्यांशी हितगुंज केले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. इतकेच नव्हे तर कसल्याही प्रकारची अडचण आल्यास बेझीजक पणे कळविण्यास सांगून समस्याचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *