विदेशी दारूच्या सहा पेट्यांसह आरोपी जेरबंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात गह्यामपंचायत सार्वत्रिक निवडणुका १८ डिसेंबर रोजी होत आहेत. याच पृष्ठभूमिवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी गैरमागार्चा वापर केला जात आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.पथकाने गुरूवार १५ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास शहरातील यादव चौक, भुयारी मार्गावर एका आॅटो रिक्शावर छापा कारवाई केली. यात ६ पेट्यांमध्ये १३८नग विविध कंपन्यांची विदेशी दारूच्या बाटल्या, किमत २१ हजार ९९० रुपये व २ लाख रुपये किमतीचा आॅटो, असा २ लाख २१ हजार ९९० रुपयाचा माल हस्तगत केला. याप्रकरणी चालक सतिश चिंचोलकर, राकेश गायधने व सत्यवान गायधने सर्व रा. कामठा ता. जि. जिल्हा असे आरोपींचे नाव आहे. तिन्ही आरोपींवर शहर पोलिस ठाणे येथे भादंविच्या कलम ६५ (ई), ७७ (अ), ८०, ८१, ८३, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *