महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान-२०२३ चे यशस्वी समापन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पोलीस अधीक्षक भंडारा लोहीत मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात ३३ वा रस्ता सुरक्षा पंधरवाडा दिनांक ११ जानेवारी २०२३ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत संपुर्ण भंडारा जिल्हयात रस्त्या सुरक्षा नियमाचे पालन करण्याकरीता ‘जनजागृती रथ’ तयार करुन भंडारा जिल्हयात जनजागृती करण्यात आली. तसेच मोटार वाहन चालकांकरीता सुचनाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लायसन्स विना वाहन चालवू नका. स्त्याच्या डाव्या बाजुनेच वाहन चालवा. भरधाव वेगाने वाहन चालवू नका. पुढे चालणाºया वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा. समांतर वाहन चालवू नका. मद्यपान करुन वाहने चालवू नका. वाहनांची हेडलॅम्प, ब्रेक लाईट, इंडीकेटर, नंबर प्लेट व ब्रेक सुरक्षित ठेवा. वाहनांची इंजिन सुस्थितीत ठेवून प्रदुषण टाळा. वाहतुकीस अडथळा होणार नाही अशाप्रकारे वाहने उभे करा. महामार्गावरील हॉटेल व ढाबे, पेट्रोलपंप, गॅरेजचे आतील आवारात वाहने उभे करावे. हेडलाईट, ब्रेक लाईट, इंडीकेटर, हॉर्न यांचे सहाय्याने योग्य ते इशारे वेळोवेळी द्यावे.

रस्त्यावर पांढºया रंगाने रंगविलेल्या खुणा स्वयंचलित दिवे व पोलीसाचे इशाºयाचे काटेकोरपणे पालन करावे. वाहनाचे बॉडी बाहेर लांब माल असल्यास, लाल दिवा किंवा फडके लावावे. अपघातग्रस्त वाहनास मदत करुन जखमींना वैद्यकीय उपचाराची सोय करावी. गुन्हयाची माहिती ताबडतोब महामार्ग सुरक्षा पथक अक्षर जवळचे पोलीस ठाण्यात द्या. पोलीस स्टेशन स्तरावर, तसेच वाहतुक शाखेतील अंमलदार यानी रस्ता सुरक्षा अभियाना अनुषंगाने विवीध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशन कारधा येथे ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अनुषंगाने आरोग्य शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन कारधा येथे आरोग्य शिबीर घेण्यात आली. पोलीस स्टेशन कारधाचे ठाणेदार आर. व्ही. थोरात, पोलीस निरीक्षक वाहतुक नियत्रंण शाखा भंडाराचे शिवाजी कदम, जिल्हयातील पोलीस स्टेशन ठाणेदार व पोलीस अंमलदार, भंडारा यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *