रानडुकराच्या हल्यात महीला गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तालुक्यातील खरबी येथे शेतावर शेती काम करण्यासाठी जात असलेल्या महीला शेतकºयांवर दबा धरुन बसलेल्या रानडुकराने हल्ला चढवुन गंभिर जखमी केल्याची घटना १६ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान खरबी शेतशिवारात घडली. नर्मदा परमानंद गोमासे (४०) रानडुकरांच्या हल्ल्यात गंभिर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वत: च्या मालकीच्या शेतात शेती काम करण्यासाठी जात असलेल्या महिलेवर गवतात दबा धरून बसलेल्या रानडुकराने हल्लाचढविल्याने महिलेच्या पायाला गंभिर दूखापत झाली आहे. सोबत असलेल्या महीलांनी आरडा ओरड केली व रानडुकराला हुसकावून लावले. दरम्यान गंभिर जखमी असलेल्या महीलेला मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसे दिवस वन्यप्राण्यांच्या हल्लामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेले आहेत.सदर घटनेमुळे शेतकºयांसह नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानडुकरांच्या हल्ल्यात गंभिर जखमी झालेल्या महीलेला शासनाच्या संबधित वनविभागाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी खरबी येथिल माजी सरपंच तथा ग्रा प सदस्य आनंद सिंगनजूडे, सुधिर गोमासे, अभय गिरीपुंजे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *