रॅलीच्या माध्यमातुन वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अपर पोलीस महासंचालक ( वा.) महाराष्ट्र राज्य मुंबई, पोलीस अधिक्षक तसेच पोलीस निरीक्षक मॅडम, महामार्ग प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.केंद्र गडेगाव येथे ‘‘रस्ता सुरक्षा अभियान २०२३ ’’ च्या निमित्ताने भंडारा जिल्हा अंतर्गत नंदलाल पाटिल कापगते हायस्कुल साकोली येथील विद्यार्थ्यांंसोबत जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीच्या माध्यमातुन वाहतुक नियमाचे पालन करण्यासबंधी जनतेला आवाहनन करण्यात आले. तसेच वाहतुक नियमांची माहिती देणारे पत्रकांचे वाटप करण्यात आले. रॅलीमध्ये जवळपास ३००ते ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय लाखनी व शासकीय औद्योगिक संस्था लाखनी येथे भेट देऊन प्राचार्य व इतर शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना वाहतुक नियमाबाबत माहीती देण्यात आली. तसेच वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करणाºया विविध वाहन चालकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.