पकाशाचा सोबती : महावितरणचा जनमित्र अथात लाइनमन !

आपण प्रकाशात आपले दैनंदिन काम करीत वाहिनी व ६.७६ किलोमीटर लघुदाब वाहिनी द्वारे वीज असतो. टीव्ही पाहणं चालू असतं. मोबाईल रिचार्ज करणं चालू असतं. मिक्सर, ओव्हन, चिमणी याचा वापर करून स्वयंपाक करणं चालू असतं. म्हणजेच विजेच्या उजेडात आपले सर्वच दैनंदिन कामे चालू असतात. अचानक लाईन जाते. सर्व व्यवहार ठप्प होतात. अवघ्या काही मिनिटासाठी लाईन जाते. मात्र आपल्या घरासह आपल्या आसपासच्या जगातील सर्वच व्यवहार ठप्प होतात. काही क्षणात लाईन येते. आपले सर्व दैनंदिन व्यवहार आपण नेहमीसारखे सुरु करतो.या मधल्या क्षणात काय होतं….विजेच्या दृष्टीने काय घडत असतं याची जाणीव किंवा माहिती कोणालाही नसते. मात्र अशा क्षणात काही माणसं आपल्या जीवाची जोखीम पत्कारून लाईन दुरुस्तीचे किंवा ती सुरळीत करण्याचे काम करीत असतात. ते सजग असतात,तत्पर असतात म्हणूनच आपल्याला २४ तास… सातही दिवस आणि संपूर्ण वर्षभर वीज उपलब्ध असते. विजेचा अखंडित पुरवठा करणारी ही माणसं कोण असतात? आपण त्यांची कामे कधीकधी दुरून बघतो. पण त्यांच्या कामाची दखल आपण कधीच घेत नाही. आपल्या पर्यंत प्रकाशाला नियमित पोहोचविणारी ही माणसे असतात. महावितरणची जनमित्र अर्थात लाईनमन. ४ मार्चला या जनमित्रांच्या कार्याची दखल घेऊन संपूर्ण राज्यात महावितरणकडून जनमित्रदिन साजरा करण्यात येत आहे. महावितरणकडून राज्यातील २ कोटी ८९ लाख ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येते. त्यात ७४.६ टक्के ग्राहक घरगुती असून १५.५ टक्के कृषिपंपधारक शेतकरी, ७.२ टक्के वाणिज्यिक ग्राहक, १.६ टक्के ओद्योगीक ग्राहक व इतर वर्गवारीतील १.२ टक्के ग्राहक आहेत. या ग्राहकांना ४,०९३ उपकेंद्र,८.०९ लाख वितरण रोहित्रे, ३.८४ किलोमीटर उच्चदाब पुरवठा करण्यात येतो. महावितरण मध्ये सुमारे ७५,००० पेक्षा अधिक तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र महावितरण मध्ये तांत्रिक कर्मचाºयांची टक्केवारी सर्वाधिक ७० टक्के आहे. त्यात सर्वाधिक संख्या फील्डवर अहोरात्र काम करणाºया लाईनमनची आहे. महावितरणच्या २ कोटी ८९ लाख एवढ्या मोठ्या संख्येतील ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यात या लाईनमनची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका असते. सामान्य ग्राहकांसोबत या लाईनमनचा नियमित संपर्क असतो.

ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला की या लाईनमनच्या माध्यमातूनच वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम केले जाते. हे करताना या लाईनमनला उन्ह्याळ्यातील कडकडीत ऊन, हिवाळ्यातील बोचणारा गारठा किंवा पावसाळयातील अखंड कोसळणारा पाऊस याचा बाऊ करता येत नाही किंवा अशा अडचणी आहेत म्हणून वीज दुरुस्ती साठी विलंब लावता येत नाही. वैद्यकीय सेवा, पोलीसविभाग, अग्निशमन सेवा या अत्यावश्यक सेवेप्रमाणेच किंबहुना महावितरणचा लाईनमन त्यापेक्षाही अधिक जोखिम पत्करून आपले कर्तव्य पार पाडीत असतो. कोरोना काळात इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपापल्या पद्धतीने अत्याधुनिक सुरक्षा साधनांचा वापर करून, शक्यतो कार्यालय अथवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा बाळगून आपली सेवा चोखपणे बजावत होते. परंतु कार्यालयात न थांबता प्रत्यक्ष बिघाड घडलेल्या ठिकाणी जाऊन, खांबावर चढून, ग्राहकांच्या घरी जाऊन महावितरणच्या लाईनमनने जीवाची पर्वा न करता खºया अर्थाने कोरोना योद्धा म्हणून याकाळात ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिली.

ही सेवा बजावताना महावितरणच्या एका मुख्यअभियंत्यासह अनेक लाईनमनला आपले प्राण मवावे लागले. पुरेशी सुरक्षितता बाळगूनही हजारो लाईनमनना कोरोनाची लागण झाली. पण तरीही न घाबरता महा-वितरणच्या लाईनमनने आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिक व चोखपणे बजावल्यामुळेच कोरोना काळात लोकांना आपल्या घरात शांतपणे राहता आले. विजेवर आधारित आपले सर्व दैनंदिन व्यवहार कोणत्याही अडथळ्याविना पार पाडता आले. कोरोना काळात लोकांना वर्क फ्रॉम होम व्यवस्थितपणे करता आले याचे सर्व श्रेय महावितरणच्या लाईनमनचेच आहे. महावितरण ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी कंपनी आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक ४४ लाख पेक्षा अधिक शेतकºयांना महावितरणकडून अत्यंत अल्पदरात वीज पुरवठा करण्यात येतो. आर्थिकदृष्टया दुर्बल असणाºया ग्राहकांना, वीज वापर कमी असणाºया ग्राहकांना, विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना, सूतगिरणीधारकांना या सर्वांना सवलतीच्या दरांत वीज पुरवठा करण्यात येतो. महावितरणला ग्राहकांना वीज देण्यासाठी वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घ्यावी लागते. त्यावर एकूण खर्चापैकी महावितरणला सुमारे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. त्याशिवाय देशात सर्वाधिक ३.०७ किलोमीटर भागात वीज पुरवठा करणाºया महावितरणला वीज यंत्रणेच्या दुरुस्ती व बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. परंतु ग्राहकांकडून वीज बिलाचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे ग्राहकांचा वीज पुरवठा अखंडित ठेवतानाच महावितरणच्या लाईनमनला वसुलीचेही काम नियमितपणे करावे लागत आहे. हे करतांना काही ठिकाणी या लाईनमनवर हल्ले होण्याच्या घटना घडताना दिसून येत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रामाणिकपणे सेवा बजावणाºया लाईनमनवर हल्ले झाल्यास हल्लेखोरांविरुद्ध महावितरणकडून कठोर कारवाई करण्यात येते. परंतु वीज ग्राहकांनी लाईनमनला सहकार्य करण्याची गरज आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा सर्वत्र, सर्वदूर पसरलेली व उघड्यावर आहे. त्यामुळे या यंत्रणेची निगा राखणे, बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करणे मोठे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *