लोकहित जपणारे सरकार : खा. सुनिल मेंढे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : केंद्र आणि राज्याचे सरकार मिळून समाजातील सर्वच घटकांच्या कल्याणासाठी अविरत कार्य करीत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून याचा प्रत्यय महाराष्ट्राला आला. महाराष्ट्रातील विद्यार्थिनी पासून महिलेपर्यंत सर्वांचीच काळजी हे सरकार घेते आणि हे तर अर्थसंकल्पाने सांगितले असल्याचे खासदार सुनील मेंढे म्हणाले. खासदार क्रीडा महोत्सव २०२३ चे उद्घाटन आणि महिला मेळाव्याचे आयोजन आज भंडारा येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आणि महिला मेळाव्यात खासदार सुनील मेंढे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रभारी संजय भेंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, माजी खासदार शिशुपाल पटले, बाळाभाऊ अंजनकर, माजी आमदार रमेश कुथे, माजीआमदार बाळा काशिवार, माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा महामंत्री चैतन्य उमाळकर, प्रशांत खोब्रागडे, राजेश बांते, विलास काटेखाये, उद्धव डोरले, हिरालाल बांगडकर, शेखर बोरसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.इंद्रायणी कापगते, सौ.कल्याणी भुरे, जि.प. गटनेते विनोद बांते, भाजपाचे शहराध्यक्ष संजय कुंभलकर, जि.प.सदस्य प्रियांक बोरकर, बंडू बनकर, प्रतिक उईके, सौ.माहेश्वरी नेवारे, सौ.वनिता डोये, महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ.माला बगमारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, सर्व तालुका अध्यक्ष, शहरातील पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाल्याचे स्पष्ट केले. केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपच्या सरकारने लोकहिताच्या अनेक योजना राबविल्या.या योजनांचा थेट लाभ सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सरकारने केले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना घोषित करण्यात आल्या. मुलीच्या जन्मापासून ते नोकरी करणाºया महिलांच्या निवाºयाच्या व्यवस्थेपर्यंत सर्वच गोष्टींचा अंतर्भाव या अर्थसंकल्पात दिसून आला.
शेतकºयांच्या दृष्टीने ही अनेक कल्याणकारी निर्णय घेतले गेले. सामान्यांच्या हिताची जोपासना करणारे हे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतुकही खासदारांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा महामंत्री चैतन्य उमाळकर यांनी केले. आजपासून सुरू झालेल्या क्रीडा महोत्सवात संपूर्ण लोकसभा मतदारसंघात विविध खेळांच्या आयोजन केले गेले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *