G-20 च्या मंचावरुन नालंदा लोककला मंचची गरुड भरारी

उल्हास तिरपुड भंडारा : जगाचे लक्ष वेधून घेणारी जी-२० शिखर परिषद आणि त्यातच भारताला मिळालेले जी-२० मधील अध्यक्षस्थान, अर्थातच ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाचे सहर्ष स्वागत प्रसंगी जुळून आलेला दुग्धशर्करा योग आहे. संपूर्ण देश, भारताच्या या स्तुत्य उपक्रमाची स्तुती करत असतानाच सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आपल्या अथक परिश्रमाने भारताच्या मातीतील लोक कलावंतांची निवड करून या देशाची लोक संस्कृतीची ओळख जगाला पटवून देण्याचे कार्य अविरत करत आहे. त्यातल्या त्यात लोककलेचा वारसा जपणारे, महाराष्ट्रातील भंडारा या छोट्याश्या शहरातील कलावंत सुशिल खांडेकर (नालंदा लोककला मंच, बहू. संस्था दवडीपार) व त्यांची संपूर्ण चमूने महाराष्ट्राची लोककलेचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करून विदर्भाची मान स्वाभिमानाने उंचावली असच म्हणता येईल. सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून उत्तर पूर्व सांस्कृतिक केंद्र दिमापुर यांच्या वतीने नुकताच १७ ते १९ मार्च दरम्यान अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सहा राज्यातील लोक कलावंतांना त्यांच्या लोककलेची देवाण घेवाण करता यावी याकरिता ह्यभारत को जानोह्ण या सांस्कृतिक कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते.

यात नालंदा लोककला मंचच्या चमूने राष्ट्रिय स्तरावर प्रतिनिधित्त्व केले. विदर्भातील गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर अशा नक्षलग्रस्त दुर्गम भागातील कलावंतांनी नालंदा लोककला मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकधारा लावणी लोककला नृत्य, कोळी नृत्य आणि जोगवा या तीनही प्रकारचे लोकनृत्य सादरीकरण करून जी२० च्या मंचावरून गरुड भरारी घेतली. आपल्या कलेचे यर्थाथवादी सादरीकरण करुन प्रेक्षकांची मने जिंकली. सोबतीला मिझोराम, आसाम, राजस्थान, मध्यप्रदेश, नागालँड या राज्यातील लोककलेचा आस्वाद प्रेक्षकांना मनसोक्त घेता आला. लोककलावंत सुशील खांडेकर यांच्या माध्यमातून स्वत: लिहून संगीतबद्ध केलेले गीत ह्यआओ भारत को जाने हमह्ण भारतातील संस्कृतीला दर्शविणाºया या गीताच्या बोलावर मनसोक्तपणे सर्व राज्यांतील लोक कलावंतांनी आपल्या लोककलेची ओळख करून दिली.

लोककलेचा वारसा तेवत ठेवण्याकरता नालंदा लोककला मंचचे प्रामाणिक आणि नागपुर येथील मातीशी जुळलेले लोककलावंत वंदिश नगराळे, भाग्यलक्ष्मी लिल्हारे, गडचिरोली येथील महेश वाढई, उद्देश कामिडवार, खोमेश बोबाटे, प्रणय मेडपल्लीवार, मयूर चौधरी, कल्याणी शेडमाके, कृष्णाली पोटावी, लीना पटोडी, दिव्या भोयर, प्रतीक्षा शहारे, भंडारा जिल्ह्यातील पुरुषोत्तम बुरडे, बेबीलता खांडेकर या सगळ्या कलावंतांचे आभार जेवढे मानावे तेवढे कमीच आहे. लोक कलावंतांना राष्ट्रीय दर्जा मिळवून दिल्याबद्दल सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांचं आम्ही सर्व कलावंत आभार व्यक्त करतो आहे. जी-२० सारख्या स्तुत्य उपक्रमाला नालंदा लोककला मंचच्या वतीने हार्दिक सदीच्छा व्यक्त करतो. विदर्भातील या कलावंतांच्या या गरुड झेपेला भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डा. अरुण कुमार मालनसूत, डॉ. सुचिता वाघमारे, डॉ. आश्लेषा अकिनवार रोडगे, सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी अभिनंदन करुन त्यांचे कौतुक केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.