महिलांच्या ५० टक्के सवलतीमुळे जिल्ह्यातील परवानाधारक वाहनधारकांवर उपासमारीची वेळ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्टÑ राज्यातील महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर करून १७ मार्चपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ महिला व पुरुषांना एसटी प्रवास पूर्ण मोफत, तर महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयामुळे महाराष्टÑ राज्यातील महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, या निर्णयामुळे टप्पा वाहतुकीची रीतसर परवानगी असलेल्या भंडारा जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा, टॅक्सी, काळी-पिवळी, जीप अशा वाहनधारकांवर मात्र उपासमारीची वेळ आल्याचे चित्र दिसत आहे. सवलतीचा निर्णय जाहीर करतांना अशा वाहनचालक- मालकांचा राज्य परवानाधारक वाहनधारकांवर उपासमारीची वेळसरकारने विचार केल्याचे दिसत नाही. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यासाठी राज्य शासनाने सवलतीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या निर्णयाच्या विरोधात परवानाधारक वाहतूक व्यावसायिकांनी आंदोलनही पुकारले होते.

एसटी प्रवास भाड्यात दिलेल्या सवलतीमुळे गावोगावी कामधंद्यासाठी किंवा नातेवाईक व इतर कारणांसाठी प्रवास करणाºया महिलाप्रवासी वर्गाने परवानाधारक काळी पिवळी व खासगी वाहनांकडे पूर्णपणे पाठ फिरविल्याचे चित्र भंडारा शहरात पहावयास मिळत आहे. एसटीच्या कमी व अनियमित फेºया असतानासुद्धा प्रवास भाड्यातील सवलतीमुळे का होईना, एक एक तास वाट पाहीन पण एसटीनेच जाईन असा निश्चय करून महिलावर्ग प्रवास करताना पाहायला मिळत आहे. खासगी गाडी मालक कितीही विनवण्या करीत असले तरी आता महिला प्रवासी तयार होत नाहीत, असे चित्र आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या हातचा रोजगार जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी बँका, पतसंस्था, बचतगट व आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेऊन खासगी प्रवासी वाहने खरेदी केली.

नोकरी नसताना प्रवासी वाहतूक करून आपल्या कुटुंबाच्या चरितार्थाबरोबरच मुलांचे शिक्षण, गाड्यांचे हप्ते फेडून संसाराचा गाडा हाकत होते. मात्र, शासनाच्या या निर्णयाने हातचा रोजगार हिरावला जाऊन पुन्हा एकदा बेरोजगार होण्याची वेळ या वाहनधारकांवर आली आहे. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून निर्णय मागे घ्यावा, यासाठी नजीकच्या काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा खासगी वाहतूकदारांनी दिला आहे. निर्णय मागे न घेतल्यास एसटी प्रवासी वाहतूक नियमाप्रमाणेच आम्हालाही प्रवासी वाहतुकीची परवानगी द्यावी, त्यापोटी अनुदान मिळावे. वाहन कर्जाच्या हप्त्यासाठी दरमहा ठरावीक रक्कम द्यावी किंवा वाहनांवरील बँका, पतसंस्था, बचतगटाची कर्जे माफ करावी, अशी मागणी खासगी वाहनधारक करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *