घड्याळ तासिका शिक्षकाचा उत्तरपत्रिका तपासण्यास नकार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : यंदाचे शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घड्याळी तासिका शिक्षकांना सेवा समाप्तीचे निर्देश निर्गमित केल्याने जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने बोर्डाचे पेपर तपासण्यास नकार देत पेपरचा गठ्ठा मुख्याध्यापकाच्या सुपूर्द केला आहे. हा प्रकार लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात घडला असून प्रमोद जांभुळकर असे पेपर परत करणाºया घड्याळी तासिका शिक्षकाचे नाव आहे. सविस्तर असे की, नुकत्याच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा आटोपल्या आहेत. परीक्षा आटोपताच बोर्डाचे पेपर तपासणीसाठी नियमित शिक्षकांसह घड्याळी तासिका शिक्षकांना पेपरचे गठ्ठे पाठविण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील शिक्षण विभागानेच शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच घड्याळी तासिका शिक्षकांचे सेवा समाप्ती केल्याने संतापलेल्या घड्याळी तासिका शिक्षकाने बोर्डाचे पेपर तपासण्यास नकार देत पेपरचा गठ्ठा मुख्याध्यापकाच्या सुपूर्द केला आहे. मुख्याध्यापकांना पेपरचा गठ्ठा सुपूर्द करणारे प्रमोद जांभुळकर मागील १४ वर्षापासून लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मागील १४ वर्षापासून इयत्ता ८ वी, ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषयशिकवत आहेत. यंदा नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत त्यांनी पर्यवेक्षक म्हणून काम केले. ते शिक्षण विभागात कार्यरत असल्याने बोर्डाने देखील त्यांना पेपर तपासणीसाठी पाठविले.
मात्र शिक्षण विभागाने अचानक त्यांची सेवा समाप्ती केल्याने संतापलेल्या शिक्षकाने पेपर तपासण्यास स्पष्ट नकार देत बोर्डाने पाठविलेला पेपरचा गठ्ठा मुख्याध्यापकाच्या सुपूर्द केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शालांत परीक्षा आटोपले नसल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या अतोनात शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये केला जात असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? असा संतप्त सवाल पालकांमध्ये केला जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.