नागपूर परिमंडलात वर्षभरात ८ हजार नव्या जोडण्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या वतीने मागील आर्थिक वर्षात नागपूर परिमंडलात ८ हजार शेतकºयांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. यात अनुसूचित जातीतील ८३२ तर अनुसूचित जमातीतील २९७ शेतकºयांचा समावेश आहे. या जोडणीमुळे शेतकºयांच्या शेतात पाणी येऊन त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महावितरणच्या वतीने शेतकºयांना नवीन वीज जोडणी देण्यासाठी विविध योजने अंतर्गत तत्परतेने कार्यवाही केली जात आहे. विशेषत: जिथे पायाभूत वीज यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा कनेक्शनला त्वरित वीज जोडणी देण्यात येत आहे. नागपूर परिमंडलाच्या वतीने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ८ हजार १० शेतकºयांना वीज जोडणीदेऊन त्यांना दिलासा देण्यात आला आहे.
नागपूर परिमंडल अंतर्गत येणाºया नागपूर शहर मंडल अंतर्गत ३१०, वर्धा शहर मंडल अंतर्गत ३ हजार ७२७ तर नागपूर ग्रामीण मंडल अंतर्गत ३ हजार ९७३ शेतकºयांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या १ हजार १२९ शेतकºयांसह खुल्या प्रवर्गातील ३ हजार ३१ व मागास प्रवगार्तील ३ हजार ८५० शेतकºयांना महावितरणने नवीन वीज जोडणी दिली आहे. शेतकºयांनी अनधिकृत वीज वापर न करता महावितरणच्या योजनांचा लाभ घेऊन अधिकृत वीज जोडणी घ्यावी तसेच विजेचे बिल नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.