कॉ. विश्वजित बनकर अध्यक्षपदी तर सचिवपदी कॉ. रजनी झेलकर

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : देशातील सर्वात पहिली आणि ऐतिहासिक विद्यार्थी संघटना आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (ए.आय.एस.एफ.) चे मोहाडी तालुका कौन्सिलचे अधिवेशन मंगळवार दि.४ एप्रिल २०२३ ला चंदूबाबा स्टेडियमच्या भव्य पटांगणात मोठ्य उत्साहात संपन्न झाले. सदर अधिवेशन कॉम्रेड आरती डोरले यांच्या अध्यक्षतेखाली तर ए.आय.एस.एफ.भंडारा जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या अधिवेशनामध्ये तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करून त्या सर्व समस्यासोडवण्यासाठी ठराव एकमताने मंजुर करण्यात आले. तसेच सरकारची शिक्षण विरोधी भूमिका आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोहाडी तालुका अध्यक्षपदी कॉम्रेड विश्वजित महेंद्र बनकर व सचिवपदी कॉम्रेड रजनी झेलकर यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी कॉ.आदित्य चव्हाण, कल्याणी कांबळे व सहसचिव आशिष वंजारी, रामेश्वर निमजे, कोषाध्यक्ष दीपक मस्के, विद्याथीर्नीप्रतिनिधी प्रगती ठोंबरे तर सोशल मीडियाची जबाबदारी सोपान माकडे यांच्याकडे सोपविण्यात आली. यांच्यासह ३५ सदस्यांची तालुका परिषद निवडण्यात आली. यामध्ये रवी बावणे, सुमित उके, न्याहाल मेहर, फैजान शेख, समिर खांदाळे, हितेश कावळे, सुमित फोंडे, हर्षदा तरारे, कल्याणी कांबळे, जितेंद्र उमरकर, अतुल ठाकरे, वशीन ढबाले, शुभम दमाहे, सिद्देश बशीने, वेदांत सपाटे, अमित सूर्यवंशी, कुणाल बारई, सायली झंझाड, वंश कारेमोरे, काजल लेंडे, पलाश वैद्य यांची कॉन्सिल सदस्य म्हणुन निवड करण्यात आली. अधिवेशनाचे सूत्रसंचालन कॉम्रेड मीनाक्षी मेहर यांनी तर आभार प्रदर्शन कॉम्रेड विश्वजीत बनकर यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *