भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : श्री सुदामा कनिष्ठ महाविद्यालय तथा स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय मोहाडी येथील समान संधी केंद्र अंतर्गत सामाजिक न्यायाचे प्रतीक व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ ला सकाळी ९ वाजता उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश चौधरी हे होते.

प्रमुख अतिथी रुपेश साखरवाडे, ममता खवास, उत्तरा बिसेन, रमेश खोब्रागडे हे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अंकुर तितीरमारे यांनी भीम गीतगाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. श्रुती सव्वालाखे, खुशी कुंभलकर, निधी हटवार, मानसी गजभिये, भावेश भुरे, प्रांजल मलेवार, आर्यन मेश्राम, साक्षी इलमे, मयुरी देशमुख, वल्लभ जिभकाटे आदी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अविनाश चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी असे म्हणत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ममता खवास यांनी सामाजिक न्याय यावर विचार प्रकट केले. गजानन तितीरमारे यांनी संविधानिक नैतिकता यावर विचार प्रकट करून भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाद्वारा राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. व समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर प्रकाश टाकला.

समता पर्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत लोंदासे तर आभार गजानन तितीरमारे यांनी केले. कार्यक्रमास संजिवकुमार डोंगरे, भरत रासे, प्रतिभा खंडाईत, गोपाल दादगाये, शरद मालोदे, प्रकाश सिगनजुडे, कविता पडोळे, प्रकाश मते, कुंदा तितिरमारे, किरण देशमुख, हितेश्वरी पटले, नम्रता कुंभलकर, कविता तितिरमारे, निर्मला नागपुरे, प्रवीण मोहतुरे, विनोद बोरकर, जीवन सार्वे, प्रदीप सपाटे व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *