भंडारा जिल्हा सेवानिवृत्त महसूल अधिकारी कर्मचारी सन्मिञ मंडळ भंडारा व्दारा सेवानिवृत्त महसूल अधिकारी कर्मचारी स्नेहमिलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सार्वजनिक वाचनालय, इंद्रराज सभागृह भंडारा येथे भंडारा जिल्हा सेवानिवृत्त महसूल अधिकारी कर्मचारी सन्मित्र मंडळ भंडारा व्दारा सेवानिवृत्त महसूल अधिकारी कर्मचारी स्नेहमिलन मेळावा कार्यक्रम दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उदघाटन गुलराज कुंदवानी जेष्ट समाजसेवी, अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार तुमसर, अध्यक्ष सिंधी पंचायत तुमसर यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमूख पाहूणे म्हणून निलकंठजी दिघोरे सेवानिवृत्त तहसिलदार रा.शिरपूर जि. धूळे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष जाधवराव साठवणे उपस्थित होते.

तसेच सन्मिञ मंडळाचेपदाधिकारी, सर्व सन्माननीय सदस्य, इतर संघटनाचे पदाधिकारी व सत्कारमूर्ती यांचे आप्तेष्ट यांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्नेहमिलनाचा सोहळा संपन्न झाला. सर्वप्रथम पाहूणे मंडळी, कार्यकारीणी पदाधिकारी यांना मंचावर स्थानापन्न करण्यात येवून सौ.आशाताईहटवार संचालीका यांचे हस्ते बॅचेस लावण्यात आले. पाहूणे मंडळी, पदाधिकारी यांचे हस्ते व सन्माननिय सदस्य, इतर संघटनेचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व दिपज्योत प्रज्वलीत करुन उपस्थितांनी पूष्प अर्पण केले. यावेळी श्रध्दांजली कार्यक्रम घेवून सन्मिञ मंडळाचे दिवंगत सदस्य यांचे नावाचे वाचन दामोदर तरारे सचिव यांनी करून सर्व दिवंगताना २ मिनिटे उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. भारतीय संस्कृतीनूसार कार्यक्रमाचे उदघाटक गूलराजजी कूंदवानी यांचा स्वागत सत्कार मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, इतर संघटनाचे पदाधिकारी यांचे हस्ते शाल, मोमेंटो, पूष्पगूच्छ देवून करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *