बीएसएनएलच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील कारागृह मार्गावरील बीएसएनएलच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला आग लागल्याची घटना आज, २३ एप्रिल रोजी अंदाजे पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत कार्यालयीन कागदपत्रे जळून राख झाली. महत्त्वाची दस्तऐवज जळाली आहे का, याबाबत तपास सुरू आहे. सुरक्षा रक्षकाने अधिकाºयांना पहाटे कॉल करून इमारतीच्या खोलीतून धूर निघत असल्याचे सांगितले. ताबडतोब अग्निशमन दल, नगर परिषद मुख्याधिकारी जाधव व पोलीस विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. यावेळी भंडारा नगर परिषद अग्निशमन दलाचे विभाग प्रमुख समीर गणवीर,सहा.विभाग प्रमुख फाल्गुन वाढई, हमीद खान पटाण,कृष्णा मेश्राम,मुसरम शेख,अश्विन मेश्राम,पंकज ईश्वरकर,रमेश कटारे,रातु सोनवणे,बालु टांगले यांनी आग विझविली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *