शेतकºयांना सरसकट मदत द्या-नाना पटोले

नाजीम पाश्शाभाई

साकोली : “गेल्या आठ-दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस, वादळ, गारपिटीमुळे साकोली उपविभाग, लाखनी साकोली व लाखांदूर तालुक्यातील अनेक भागात उन्हाळी भात, मका, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हातातील भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे.त्यामुळे कृषी विभाग व महसूल विभागाने तत्काळ नुकसान झालेल्या उन्हाळी पिकांची पाहणी करून शेतकºयांना लवकरात लवकर जिल्हाधिकाºयांकडे अहवाल सादर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकºयंवर आसमानी संकटं सातत्याने होत आहे मात्र वर्तमान सत्ताधाºयंकडून शेतकºयंच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकºयंसमोर आलेल्या संकटाबाबत परिसरातील आमदार तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच या भागाला भेट देऊन लाखनी तहसीलच्या पालांदूर कृषी मंडळातील शेतकºयंच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून महसूल विभाग, कृषी विभागाच्या अधिकाºयंना सूचना केली आहे.

लाखनी लाखांदूर.व साकोली तहसीलमधील नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत सर्वेक्षण करून पंचनामा करून अहवाल जिल्हा अधिकाºयंना सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. राज्यात अवकाळी पावसामूळे शेतकºयंच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्तमान सरकार ने शेतकºयंच्या प्रश्नाकडे दुर्लक्षित धोरण अवलंबिले आहे. शेतकºयंवर आलेल्या संकटावर सरसकट मदत करण्याऐवजी सरकार टाळाटाळ करीत आहे यासंबंधी काँग्रेसने महामहिम राज्यपाल महोदयांना राज्यातील त्रस्त शेतकºयंच्या समस्येची माहिती दिली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयंना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे अशी माहिती पटोले यांनी दौºयनिमित्त दिली. सध्या मे महिना असून उन्हाळी हंगामात जिल्ह्यात १ मे ते ३ मे या कालावधीत ५५ मिलिमीटर पावसाचीनोंद झाली आहे.

विशेष म्हणजे आजपर्यंत उन्हाळ्याच्या मे महिन्यात एवढ्या पावसाची नोंद कधीच झालेली नाही. एप्रिल महिन्यात सुमारे २५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साकोली उपविभाग लाखनी लाखांदूर व साकोली तहसील परिसरात अवकाळी पाऊस, वादळ व गारपीट सुरू आहे. यामध्ये उन्हाळी भात पीक उद्ध्वस्त झाले असून, अनेक गावांमध्ये कच्च्या घरांची पडझड झाली आहे. वादळामुळे अनेक घरांची छप्परे उडून गेली.विद्युत खांब पडल्याने ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृषी उपविभाग साकोलीत लाखनी , लाखांदूर व साकोली या तीन तालुक्यांचा समावेश होतो.

या उपविभागातील तीनही तालुक्यांमध्ये एकूण २५७०८ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये लाखनी तहसीलमध्ये ४८८७ हेक्टर, साकोली तहसीलमध्ये ७६४७ हेक्टर आणि लाखांदूर तालुक्यात११२४४ हेक्टर क्षेत्र आहे. अशी एकूण २३७८३ आहेत. उर्वरित काही हेक्टर क्षेत्रात अन्य पिकाची लागवड करण्यात आली होती त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.परिसरात उन्हाळी भात पिकाची लागवड झाली असून, याशिवाय तिन्ही तालुक्यांमध्ये सुमारे१७२ हे.मध्ये मका पीक आणि ५४१ हे. क्षेत्रात शेतकºयंनी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे.

प्रशासकीय यंत्रणेकडून अवकाळी पाऊस, वादळ, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे ३४५ हे. क्षेत्रातील उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. या अवकाळी पाऊस, वादळ, गारपिटीमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे तसेच शेतकºयंचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बँक कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पिडीतांनी शासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली आहे.

अवकाळी पावसाने ३९० हेक्टर शेतीचे नुकसान अवकाळी आणि वादळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जवळपास ७०२ घरांची पडझड तर ३९० हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात अपेक्षित असलेले नुकसान उन्हाळ्यात झाल्याने शेतकरी आणि सामान्य नागरिक पूर्णपणे खचून गेला आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी उन्हाळ्याची अनुभूती न येता जणूकाही पावसाळा सुरू असल्याचे वातावरण सध्या अनुभवास मिळत आहे. १ ते ३ मे या कालावधीत जिल्ह्यात सतत कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळला.

काही तालुक्यांना याचा फटका जास्त बसला. परिणामी ५ जनावरांचा मृत्यू, ७०२ घरांचे नुकसान आणि ३९० हेक्टर शेत जमिनीतील पिकांचे नुकसान या कालावधीत झाले आहे. लाखनी तालुक्यातील दोन आणि पवनी तालुक्यातील तीन जनावरांचा मृत्यू झाला असताना पडलेल्या घरांमध्ये ६९९ अंशत: तर तीन घरे पूर्ण पडली आहेत. लाखनी तालुक्यात अंशत: पडलेल्या घरांची संख्या ६८१ असून लाखांदूर तालुक्यात १८ घरे पडली आहेत. झालेले शेतीचे नुकसान हे पूर्णपणे लाखनी तालुक्यातील आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *