खरग कटबीयाना धमकी दणाºयावर गन्हा दाखल करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणाºया भारतीय जनता पाटीर्चे चित्तपुर, (कर्नाटक) विधानसभेचे उमेदवार मनीकांत राठोड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी भंडारा जिल्हा कांग्रेस कमिटीचे मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात भंडारा पोलिस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीतुन करण्यात आली आहे. मनीकांत राठोड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असुन त्याच्यावर कर्नाटकात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे खर्गे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीच्या काळात अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा सबळ पुरा वाही यावेळी तक्रारीसोंबत जोडलेला आहे.

काँग्रेस अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बघ्याची भूमिका घेतल्या बद्दल त्यांचे सुध्धा जाहिर निषेध भंडारा जिल्हा कांग्रेस कमिटी तर्फे करण्यात आला. यावेळी प्रेमसागर गणवीर, प्रशांत देशकर, राजू निर्वाण, धनराज साठवने, मंजूषा चव्हाण, स्वाति हेडाऊ, प्रमोद मानापुरे, अनिक जमा, राजेश हटवार, आकाश बोंद्रे, नरेंद्र साकुरे, दिलीप कोटवानी, शेख नवाब, इमरान पटेल, सोहेल अहमद, विजय कापसे, पवन मस्के, योगराज झलके, सुनील बांते, अशोक चोले पवन वंजारी, श्रीकांत बंसोड़, विनीत देशपांडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *