आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी वैभव चोपकर तर सचिवपदी मिनाक्षी मेहर

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : दि.२६ एप्रिल ला देशातील सर्वात पहिली आणि ऐतिहासिक विद्यार्थी संघटना आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन(ए.आय.एस.एफ.)चे भंडारा जिल्हा कौन्सिलचे अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ए.आय.एस.एफ.या डाव्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेची स्थापना दि.१२ आॅगस्ट १९३६ मध्ये स्वातंत्र्यापूर्वी त्या काळातील क्रांतिकारकांनीं केली. ए.आय.एस.एफ.ने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.यामध्ये ए.आय.एस.एफ. चे अनेक कार्यकर्ते शहीद सुद्धा झाले.स्वातंत्र्यानंतर सन १९४७ पासून भारतीय स्वातंत्र्य लढ्याची मूल्य जोपासत लोकशाही व संविधानिक मागार्ने विश्वशांती, प्रगती आणि वैज्ञानिक समाजवाद हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत”स्टडी अँड स्ट्रगल”हा ब्रीदवाक्य घेऊन सर्वांना समान,विनामूल्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे,यासाठी लढत आहे.

सर्वांना शिक्षणासोबतच कुवतीनुसार रोजगार, सर्वांना विनामूल्य आरोग्य ,समाजात स्त्री-पुरुष समानता, जात आणि वर्गवीहीन समाजाची निर्मिती इत्यादी मागण्यांसाठी काम करीत आहे.अशा या डाव्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे अधिवेशन नुकतेच भंडारा जिल्ह्यातील वन वैभव आदिवासी आश्रम शाळा,कोका (जंगल) येथे पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ध्वजारोहण करून ए.आय.एस.एफ.च्या ध्वजाला सलामी देण्यात आली.अधिवेशनाचे उद्घघाटन विवेकानंद बहु उद्देशीय शिक्षण संस्थेचे संचालक तथा ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक श्री. बाळकृष्णजी सार्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पहिल्या व खुल्या सत्राचे अध्यक्ष कॉ. हिवराज उके, माजी राज्य उपाध्यक्ष ए.आय.एस.एफ. महाराष्ट्र राज्य हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ए.आय.एस.एफ. राज्याध्यक्ष कॉ. विराज देवांग, श्रीमती स्वाती ताई वाघाये सभापती महिला व बाल कल्याण, जि. प.भंडारा, कॉ.सदानंद इलमे, डॉ. मृण्मयी बन्सोड, प्रा.धनश्री माकडे,अंकुश पंचबुद्धे वाय. एस. जे. प्रतिनिधी, पवन वंजारी यन. एस. यु. आय. प्रतिनिधी, कॉ. शुभदा बांते आदी पुरोगामी व डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिवेशनाचे दुसरे सत्र कॉम्रेड प्रितेश धारगावे यांच्या अध्यक्षतेखाली तर ए.आय.एस.एफ. महाराष्ट्र राज्याध्यक्ष कॉम्रेड विराज देवांग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करून त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी ठराव एकमताने मंजुर करण्यात आले. तसेच भाजपा-मोदी सरकारची शिक्षण विरोधी भूमिका आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020 चे विरोध करून जिल्ह्यात ठीक-ठिकाणी या धोरणाविरोधात निदर्शने-आंदोलन करण्याचे एकमताने ठराव घेण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हाअध्यक्ष पदी कॉम्रेड वैभव चोपकर तर सचिव पदी कॉम्रेड मीनाक्षी मेहर यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष पदी कॉ. रवी बावणे व सहसचिव कॉ. दामिनी नंदेश्वसर , कोषाध्यक्ष कॉ.अपेक्षा वैद्य यांच्यासह ३३ सदस्यांची जिल्हा कौन्सिल निवडण्यात आली.यामध्ये कॉ.प्रेरणा सिंगनजुडे, कॉ.विश्वजित बनकर,कॉ. सुमित गोमासे, कॉ.आरती डोरले,कॉ.प्रगती ठोंबरे,कॉ.वैभव तुमसरे, कॉ.प्रशिक वैद्य,कॉ.अजय चोपकर,कॉ. प्रसाद लांबकाने,कॉ.आर्यन भोंडे,कॉ.अतुल लेंडे, कॉ.सतिश गजाम,कॉ.अक्षय सोनकुसरे,कॉ.आशिष वंजारी, कॉ.रामेश्वर निमजे,कॉ.आदित्य थोटे,कॉ.दीपक भोयर,कॉ.दीपक मस्के, कॉ.पलाश वैद्य,कॉ.इशिका बावणे, कॉ.निखिल कुंभलवार,कॉ.हर्षल गुरवे, इत्यादिंची कॉन्सिल सदस्य म्हणुन निवड करण्यात आली.अधिवेशनाचे सूत्रसंचालन कॉम्रेड मीनाक्षी मेहर यांनी तर आभार प्रदर्शन कॉम्रेड प्रेरणा सिंगनजुडे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *