माध्यम प्रतिनिधींनी केला नागझिरा अभयारण्याचा अभ्यास दौरा

 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील पत्रकारांकरीता अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. सदर अभ्यास दौरा कार्यक्रम जैयरामेगौडा आर. उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अभ्यास दौºयामध्ये नवेगांवनागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धणाबाबत माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. त्यानंतर “Mission Merilife” चे कार्यक्रम सुरु करुन त्याबाबत सगळयांना मार्गदर्शनकेले.
नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत आरआरटी व श्वान पथक दलाद्वारे त्यांच्या कर्तव्याबाबत विभिन्न कार्यवाही प्रात्याक्षिक स्वरूपात करुन दाखविले. पवन जेफ, उपसंचालक, नवेगांवनागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली व आरआरटी जलद बचाव दल नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत विविध विषयांवर माहितीचे सादरीकरण करण्यात आले. अभ्यास दौºयात सर्व पत्रकारांनी सहभाग घेतला याबाबत पवन जेफ, उपसंचालक, नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली यांनी आभार मानले. या अभ्यास दौºयामध्ये राजेंद्र आर. सदगीर विभागीय वन अधिकारी (अति.कार्य.), रोशन राठोड सहाय्यक वनसंरक्षक, अनिकेत चिचामे पशुवैद्यकिय अधिकारी, विकास भोसले वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरा, सदाशिव अवगान वनपरिक्षेत्र अधिकारी पिटेझरी, एम.एन. माकडे वनपरिक्षेत्र अधिकारी कोका हे सुध्दा सहभागी झाले होते. यावेळी गोंदिया व भांडारा जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.