सुसंस्कार शिबिरातून संस्कारक्षम तरुण घडावा – आ. नाना पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला तरुण हे देशाचे भवितव्य असून सुसंस्कार शिबिरातून संस्कारक्षम तरुण घडावा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी केले आहे. ते लाखांदूर येथील श्री गुरुदेव युवा सेवा लोकार्पण व बाल सुसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. परिणय फुके हे होते. प्रारंभी आ.नाना पटोले हे श्री गुरुदेव प्रार्थना सभेत सहभागी झाले.अत्यंत आल्हाददायक वातावरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रार्थना सभेत मग्न झाले होते.

श्री.गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर च्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेकडे सेवाश्रमाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली. त्यानुसार आ.नाना पटोले यांनी १ कोटी रुपयांचा निधी नगरपंचायतीच्या नावाने जमा करून वैशिष्टपूर्ण योजनेतून सुसज्ज अशी श्री गुरुदेव सेवाश्रम भवनाचे बांधकाम करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त लक्ष्मण दादा काळे महाराज, डॉ. प्रशांत दादा ठाकरे, लाखांदूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे, प्रकाश बाळबुद्धे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर राऊत, डेलिस ठाकरे, प्रा. पि.एम. ठाकरे, माजी जिल्हा परिषदअध्यक्ष वसंता एंचीलवार, जि. पं.सदस्य रसिका रंगारी, डॉ.प्रतीक उईके, प्रियंक बोरकर, न.प.उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, गटनेता बबलू नागमोती, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, नगरसेवक रज्जू पठाण, सोफिया पठाण, सौ निशा बगमारे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम भागडकर, महिला तालुकाध्यक्ष वर्षा मेंढे, माजी गटनेते रामचंद्र राऊत, नगरसेवक बंटी सहजवाणी, लता कुडेगावे, नीलम हूमने, सहाय्यक अभियंता रजत अतकरे, गोविंदराव भूरले, भाऊराव दिवटे, योगेश कुटे, सुरेश लंजे, रामचंद्र राऊत, रमेश भैय्या, लता प्रधान, सुभाष खीलवानी, लेकराम ठाकरे, जितू सु- खदेवे तथा सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ.परीणय फुके यांनी श्री गुरुदेव मंडळाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिले. याचवेळी दहा दिवसीय बाल सुसंस्कार शिबिराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.