मोहाडीत वादळी वाºयाने घरावरील पत्रे आणि झाडे उन्मळून पडले

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील पंचायत समितीजवळ माता माँ सातबहिणी जवळील पुरातनकालीन कडूनिंबझाड उन्मळून पडले. मोहाडी तालुक्यातील कुशारी-मोरगावभिकारखेडा व आदी गावात गुरुवार दि.१८ मे २०२३ रोजीदुपारी ३ वाजेच्या सुमारास पावसासह वादळी वाºयामुळे धावपळ उडाली होती.यामुळे शेतकºयांसह नागरिकांची धांदल उडाली. काही घरावरील पत्रेही उडाल्याने वादळामुळे एकच गोंधळ उडाला होता.जोरदार सुटलेल्या वादळ वाºयात झाडे व झाडाच्या फांद्या उन्मळून पडल्या. रौद्र रूप घेवून काही वेळ वादळाने कुशारी परिसरात थैमान घातला. तसेच गारांचा पाऊस पडला.

यात कुशारी येथील पुनाराम गडरीया, शिवराम अंबागडे यांचे पूर्णत: घरांचे नुकसान झाले. तर पन्नासच्या वर घरांचे छप्पर उडाले. घराच्या बाहेर व आत असलेल्या धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वीज, पाऊस यामुळे विजेचे उपकरणात बिघाड झाले आहे.तसेच मोरगाव येथील अंदाजे आठ ते दहा गुरांचे टिनशेड उडाले आहे. नुकसानीचा पंचनामा कुशारी गावात तलाठी विद्या समरी करीत आहेत. तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहाडीचे सभापती रितेश भाऊराव वासनिक व उपसभापती विठ्ठल रामाजी मलेवार यांनी नुकसान ग्रस्तांना भेट दिली. झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

कुशारी परिसरात वादळी वाºयासह पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. घरावरील पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, नुकसान ग्रस्तांना शासनाकडून तात्काळ घरकुल व नुकसान भरपाई द्यावी. विठ्ठल रामाजी मलेवार, उपसभापती पंचायत समिती,मोहाडी.

वीज पडून चार शेळ्यांच्या मृत्यू

गुरुवार दि.१८ मे २०२३ ला सायंकाळी अंदाजे ३.३० वाजता विज पडून मोहाडी तालुक्यातील मौजा वडेगाव येथील शेतकरी गणपत सदाशिव रेहपाडे यांच्या शेतात शेळ्या चरत होत्या. दुपारी ३.३० वाजता सुमारास विज पडून चार शेळ्यांचा विज पडुन मृत्यु झालेला आहे.त्या शेळ्यांची अंदाजे किमत ३५ हजार रुपये आहे. नुकसानीचा प्राथमिक अहवाल वडेगाव येथील तलाठ्यांनी तहसीलदार दीपक करांडे मोहाडी यांच्याकडे पाठवले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *