अनियंत्रीत कार झाडावर आदळून चालकाचा जागीच मृत्यू

गोंदिया : गोरेगाव जवळ अनियंत्रित कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १९) सकाळी नऊच्या सुमारास जानाटोला (भडंगा) पेट्रोलपंपाजवळ घडली. श्रीचंद रोहडा (वय ७०, रा. गोंदिया) असे मृताचे नाव आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले श्रीचंद रोहडा हे गोंदियाकडून मुंडीपारकडे कारने (सीजी ०४/ एच. सी. ३९९५) जात होते.

दरम्यान, जानाटोला (भडंगा) पेट्रोलपंपाजवळ भरधाव असलेल्या कारच्या स्टिअरिंगवरून त्यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली. धडक इतकी जबर होती की, कारचा समोरील भाग तुटून बाजूला फेकला गेला. श्रीचंद रोहडा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.