भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर या कार्यक्रमात प्रशासकीय यंत्रणेला सहभागी करुन तालुका स्तरावर दिनांक २२ ते २६ मे २०२३ या कालावधीत प्रत्येक तहसील कार्यालयाच्या अंतर्गत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहेत. महिलांनी त्यांचे वैयक्तीक तक्रारी असल्यास सदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरात खालील दिनांक, वेळ व ठिकाणी तक्रारीसह उपस्थित राहावे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी कळविले आहे.