खा. सुनील मेंढे यांच्या गाडीला ट्रकची धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : खासदार सुनील मेंढे यांच्या ताμयातील वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात अन्य नुकसान झाले नाही. खासदार सुनील मेंढे दिव्यांग साहित्य वाटप शिबिराला व जनता दरबाराला उपस्थित राहण्यासाठीगोंदिया जिल्ह्यातील अजुर्नी मोरगाव कडे निघाले होते. वैनगंगा नदीवरील पुलाच्या दिशेने जात असताना महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती याच वाहतूक कोंडी दरम्यान दोन ट्रक चालकांचे भांडण झाले. खासदारांच्या ताμयातीलइनोव्हा गाडीच्या मागे असलेल्या ट्रक चालकाला दुसº्या ट्रकचालकाने गाडी-खाली ओढले.

यामुळे गेअर मध्ये असलेला ट्रक खासदारांच्या ताμयातील गाडीला घासत गेला. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने गाडीत बसलेल्या सहकाºयांना व वाहतूक कोंडीत अडकलेल्या इतर दुचाकी, चारचाकी वाहनांना तसेच नागरिकांना त्या अनियंत्रित ट्रक मुळे कोणतीही इजा झाली नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *