हिंगणा एमआयडीसी परिसरात कुख्यात गुंडाचा खून?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी हिंगणा (नागपूर) : एमआयडीसी परिसरातील राजीवनगर (ता. हिंगणा) जवळ असलेल्या टेकडीवर मंगळवारी (दि. २३) सकाळी कुख्यात गुंडाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी त्याच्या डोके व गालावरील जखमा विचारात घेता त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट होते. चंदन शिवकुमार शाह (२२, रा. कार्तिकनगर-गजानननगर, हिंगणा रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. चंदन हा कुख्यात गुंड असून, त्याच्या विरोधात गंभीर गुन्ह्यांच्या नोंद असल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली. तो जेवण आटोपल्यानंतर सोमवारी (दि. २२) रात्री १० वाजताच्या सुमारास खर्रा खाण्यासाठी राजीवनगर परिसरातील पानटपरीवर आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गजानननगर व राजीवनगरच्या मागच्या भागाला असलेल्या टेकडीवर त्याचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक (गुन्हे) मुकुंद कवाडे, उपनिरीक्षक संतोष रामलोड, विकास जाधव, सहायक फौजदार नितीन जावळेकर व सहकाºयांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा शहरातील ग्रामीण रुग्णालयातपाठविला. या घटनेचा सर्व दिशांनी तपास केला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

गंभीर गुन्ह्यांची नोंद

चंदनच्या विरोधात लूटमार, मारहाण, चोºया व तत्सम गंभीर गुन्ह्यांची पोलिसांत नोंद आहे. तो लहानपणापासून गुन्हेगारांच्या टोळीत वावरायचा. याच टेकडीवर सन २०११ मध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तीन ते चार जणांनी दगडांनी ठेचून त्या तरुणाचा खून केल्याचे तसेच त्या खुनात चंदन हा आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्याच्या डोके व गालावरील जखमी, रक्ताने माखलेला चेहरा विचारात घेता, त्याचा काही गुन्हेगारांनी आपसी वैमनस्यातून खून केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *