कंपनीच्या प्रगतीसाठी कंपनीबद्दलची आपुलकी, जबाबदारी व सांघिकवृत्ती महत्वाची-सुहास रंगारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महावितरणला नμयात आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत अथक परिश्रमाची गरज असून ते करताना कर्मचा-यांत कंपनीबद्दल आपुलकीची भावना असणे, कामाची जबाबदारी स्वीकारणे व सांघिकवृत्तीने काम करण्याची गरज आहे. कर्मचा-यांनी काम करताना यासर्वांचा अंगीकार करवा, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले. महावितरणच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी होते. यावेळी ते बोलत होते.वाढती ग्राहकसंख्या त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आणि वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा अशी अनेक आव्हाने कंपनी समोर आहेत. त्या आव्हांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आपल्यालाआपल्या सेवेत सातत्याने सुधारणा करण्याची गरज आहे असे मत सुहास रंगारी यांनी यावेळी व्यक्त केले.

या प्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता (प्रभारी) अमित परांजपे, अधीक्षक अभियंता हरीश गजबे,अविनाश सहारे यांनी महावितरण कंपनीची यशस्वी पी.एस.तुलसी, कार्यकारी अभियंते राजेश घाटोळे, समीर शेंदरे, रुपेश टेम्भूर्णे, हेमराज ढोके, राहुल जिवतोडे, प्रफुल्ल लांडे, समीर टेकाडे, राजेंद्र गिरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने प्रामुख्याने उपस्थित होते. निवृत्त महाव्यवस्थापक वाटचाल आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक नियोजनाची माहिती दिली. कार्यक्रमात अधीक्षक अभियंता अजय खोब्रागडे, उप महाव्यवस्थापक प्रमोद खुळे, अधीक्षक अभियंता (प्रभारी) नारायण लोखंडे, भीमराव हिवरकर, महाव्यवस्थापक (प्रभारी) (वित्त व लेखा) अतुल राऊत,सहाय्यक महाव्यवस्थापक प्रदीप सातपुते,सुरक्षा व दक्षता विभागाचे उपसंचालक सुनील थापेकर, सहाय्यक संचालक शरद दाहेदार, वरिष्ठ व्यवस्थापक अशोक पोईनकर यांचा सुहास रंगारी यांच्या हस्ते कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक अनुश्री पांडे यांनी केले.                                        संचालन अमित पेडेकर तर आभार प्रदर्शन अनुजा पात्रीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियेते, अधिकारीयांच्यासह अनुजा पात्रीकर, सारिका तायडे, शिवकुमार पिसे, स्वप्नील साखरे, गौरव मारशेट्टीवार, राहुल हिवसे, मनीषा चौकसे, स्वाती आंबुलकर इत्यादींनी परिश्रम घेतले. या वर्धापन दिन कार्यक्रमास नागपूर परिमंडलातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते,अधिकारी यांच्यासह अनुजा पात्रीकर, सारिका तायडे, शिवकुमार पिसे, स्वप्नील साखरे, गौरव मारशेट्टीवार, राहुल हिवसे, मनीषा चौकसे, स्वाती आंबुलकर इत्यादींनी परिश्रम घेतले. या वर्धापन दिन कार्यक्रमास नागपूर परिमंडलातील अभियंते,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.