मग्रारोहयो मजुराचा तलावात बडून मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ५० टक्के ग्रामपंचायत स्तर मामा तलावातील गाळ काढणे कामावरील मजुराचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना खराशी येथे गुरुवार(ता.८) सकाळी ११:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतक मजुराचे नाव विलास सिताराम झलके(३२) रा. धानला/ खराशी, ता. लाखनी असे आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर हे घटनास्थळी दाखल झाले. पालांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद केली असून या असल्यामुळे सूर्य सकाळपासूनच आग ओकत असल्याने मग्रारोहयो ची मजूर प्रधान(अकुशल) कामे सकाळी ७:०० वाजता पासून सुरू करण्याचे प्रशासनाचे निर्देश असल्यामुळे गाळ काढण्याचे काम नियोजित वेळी सुरू होते. सकाळ पाळीतील मजुरांची हजेरी झाल्यानंतर मृतक विलास याला त्याचे घरची घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

गट ग्रामपंचायत खराशी मध्ये धानला गाव समाविष्ट असून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मामा तलाव खराशी गट क्रमांक ६५५ चे तलावातून गाळ काढण्याचे काम मागील १५ दिवसापासून सुरू आहे. त्यावर मृतकासह २४२ मजूर काम करीत आहेत. सध्या नवतपा सुरू असून पारा ४१ अंशाचे वर पाळीव जनावरे तलावालगत दिसल्यामुळे बैलांना धुवून घरी घेऊन जाण्याच्या उद्देशाने तो ११:०० वाजता दरम्यान कामावरून गेला. बैल धुण्यासाठी तलावातील पाण्यात नेत असताना पाण्याचे खोलीचा अंदाज न आल्याने तलावातील पाण्यात बुडून मरण पावला. घटनेची माहिती होताच तलावावर कुटुंबीयांसह गावकºयांची गर्दी जमा झाली. रोजगार सेवकाने ग्रामसेवक व तलाठ्याला घटनेचीमाहिती दिली. स्थानिक प्रशासनाने पंचायत समिती व तालुका प्रशासनास कळविले.

घटनेची माहिती होताच तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, पालांदुर चे मंडळ अधिकारी राकेश पंधरे, खराशी चे तलाठी हटनागर, तांत्रिक पॅनल अधिकारी गिरिधर मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापसे, पंचायत समिती सदस्य योगिता झलके, सरपंच योगेश झलके, ग्रामसेवक रवी टोपरे, सामाजिक कार्यकर्ता विजय कापसे, घटनास्थळी पोहचले. भास्कर झलके यांचे फियार्दी वरून पालांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मडावी, सहाय्यक फौजदार ओमप्रकाश केवट, पोलिस शिपाई अंडेल घटनास्थळी पोहचले. नातेवाईकांचे मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून सर्व सोपस्कार पार पडल्यावर मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले. मन: मिळाऊ विलास चे अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *