ट्रॅक्टर-मोटरसायकलच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभली बस स्थानकावर ट्रॅक्टर व मोटरसायकलच्या धडकेत मोटरसायकलस्वार घटनास्थळी ठार झाला असून मोटरसायकलवर बसलेली पत्नी गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी भंडारा येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आलेआहे. आज गुरुवार दिनांक ८ जूनला सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान कुंभली येथील बस स्थानकावर ईटखेड्यावरून साकोलीकडे येणारी मोटरसायकल क्रमांक एमच ३५ एपी ४१२० यावर पती-पत्नी साकोलीकडे अमोल विश्वनाथ हटवार वय २५ व पत्नी निशा अमोल हटवार हे दोघेही येत असताना कुंभली जवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागच्या चाका मध्ये मोटरसायकल अनियंत्रित होऊन गेल्यामुळे अमोल हटवार याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी निशा अमोल हटवार ही गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयातून भंडारा येथे पाठवण्यात आले आहे ट्रॅक्टर हा कुंभली येथील नीताराम भांडारकर यांचा मालकीचा आहे.

ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ एल ६८४४ हा साकोली पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आलेला आहे. अमोल हटवार याचे रामनवमीच्या दिवशी म्हणजे तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे अमोल हटवार याच्यावर साकोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला आहे ट्रॅक्टर चालकाला साकोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.