जिल्ह्याातील खासगी शाळेच्या बस फेºया बंद करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन भंडारा जिल्हा तर्फे श्रीमती तनुजा अहिरकर, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा व जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर भंडारा यांना जिल्ह्यातील खाजगी शाळांची बस सेवा बंद करून ते ज्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांनाच देण्यात यावे या मागणीसाठी सोमवार दि. १२ जून रोजी निवेदन आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्यसचिव कॉम्रेड वैभव चोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हासचिव कॉम्रेड मीनाक्षी मेहर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. भंडारा जिल्ह्यात खासगी (सी.बी.एस.सी.) शाळेसाठी अगदी उत्कृष्ट अशी बस सेवा पुरवली जाते. त्यांना ना बस च्या वेळेचे टेंशन, ना उशीर होण्याचे टेन्शन,या उलट ज्यांच्या हक्काची मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मासिक पास असते अशा सर्वसामान्य गोरगरीब घरच्या विद्यार्थ्यांना अगदी निकृष्ट दर्जाची सेवा पुरवली जाते. जिल्ह्यात सनμलॅग, फादर एगेंल, माणिक नगर तुमसर व इतर खासगी (सी.बी.एस.सी.) शाळेला बसची सुविधा वेळेवर पुरविली जाते. पण जे त्या सेवेचे खरे लाभार्थी आहेत तेच वंचित राहतात. बस वेळेवर येत नाही त्यामुळे त्यांचा शैक्षणिक नुकसान होतो.

घरी वेळेवर पोहचू शकत नाही त्यामुळे त्यांचा पालकांना सुद्धाकाळजी लागून राहते. या सर्व कारणांमुळे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रासातून जावे लागते. त्यामुळे आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन भंडारा जिल्हा कॉन्सिल ने खाजगी (सी.बी.एस. सी.) शाळेच्या बस सुविधा बंद करुन त्या बस ज्यांच्या हक्काच्या आहेत त्यांनाच उपलब्ध करून द्यावे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पुर्ण करावी ही अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणी पूर्ण झाली नाही तर रा. प. च्या विभागीय कार्यलयासमोर आंदोलनाचा इशाराही यावेळी जिल्हासचिव कॉम्रेड मीनाक्षी मेहर यांनी दिला आहे. यावेळी कॉम्रेड मीनाक्षी मेहर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिष्टमंडळात आशिष कोहळे, अपेक्षा वैद्य, सोपान माकडे, आशिष वंजारी, सुमित गोमासे आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *