सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन संपविले जीवन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : दिवसा कपडे शिवण्याचे काम व रात्री सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाºया व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शिवनगावच्या विक्तुबाबानगर ते ईसासनी रोडवरील शिवारात घडली आहे. किलेंद्र मगरु ठाकरे (वय ४५, रा. पंचशीलनगर, लता मंगेशकर हॉस्पीटलजवळ, एमआयडीसी) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते दिवसा कपडे शिवण्याचे काम तर रात्री सुरक्षा रक्षकाची नोकरी करीत होते.

त्यांच्या कुटुंबात पत्नी, १६ वर्षाची मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा आहे. त्यांची पत्नी ही सुद्धा शिवणकाम करते. सोमवारी किलेंद्र यांनी एका झाडाच्या फांदीला दुपट्टा बांधून गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी निरज शालीकराम बिसेन (वय ३४, रा. एकात्मतानगर) यांनी दिलेल्या सुचनेवरून सोनेगाव ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल मंगलकर यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. गळफास घेतलेल्या किलेंद्र यांनी नुकतेच घर बांधले होते. त्यामुळे त्यांच्यावर कर्ज झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.